BNR-HDR-TOP-Mobile

Chakan :शिरूरच्या उमेदवारांचा प्रचार सुरु… ;रॅली, सभा आणि मेळाव्यांची तयारी

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव आणि राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे हे दोन प्रमुख उमेदवार शिरूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांच्या समोर उभे ठाकणार असल्याचे आता जवळजवळ स्पष्ट झाले असून या उमेदवारांचा प्रचार मागील काही दिवसांपासून गाठीभेटी मधून सुरु झाला आहे.

शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी (दि.१५) भव्य ‘रॅली’तून खासदार आढळराव यांच्या प्रचाराची जोरदार सुरुवातच झाल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार रविवारी (दि.१७) चाकण जवळ भोसे (ता. खेड) येथे कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेणार आहेत. सेना आणि राष्ट्रवादी अशा दोन्ही बाजूकडून जोरदार आरोप प्रत्यारोप सभा आणि मेळाव्यांतून झाले असून पुढील काळात आणखी टोकाच्या टीका टिप्पण्या होणार असल्याने येत्या काळात प्रचाराची रणधुमाळी अधिक टोकदार होण्याची शक्यता आह़े.

  • दरम्यान मागील काही दिवसांतील जातींच्या अनुषंगाने झालेल्या शाब्दिक चकमकींच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी खा. आढळराव यांनी चाकण मध्ये आल्यानंतर सर्वात आधी मार्केट समोरील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शहरातून ‘रॅली’ला सुरुवात केली. यावेळी त्यांच्या समवेत आमदार सुरेश गोरे, आमदार शरद सोनवणे, अशोक खांडेभराड, रामदास धनवटे, राम गावडे,शिवाजी वर्पे, प्रकाश वाडेकर , चाकणचे आजी- माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
.

HB_POST_END_FTR-A1
.