Chakan : गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार

एमपीसी न्यूज – आई आजारी असल्याचे कारण सांगून तिघांनी मिळून महिलेला औरंगाबाद येथे नेले. तिथे गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. ही घटना नोव्हेंबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत घडली.

याप्रकरणी 27 वर्षीय पीडित महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मतीन रशीद, सय्यद हमीद, सिद्धिकी मोहसीन, रशीद सय्यद (सर्व रा. औरंगाबाद) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ओळखीचा गैरफायदा घेत आरोपींनी पीडित महिलेची आई आजारी असल्याचे कारण सांगून तिला औरंगाबाद येथे नेले. औरंगाबादमध्ये एका घरामध्ये ठेवून महिलेला गुंगीचे औषध दिले. त्यानंतर महिलेवर बलात्कार केला.

तसेच औरंगाबाद येथील एका लॉजवर नेऊन तिचा विनयभंग केला. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.