Chakan: रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव जाधव यांचं निधन

Chakan: RPI District Vice President Babanrao Jadhav passed away खेड तालुका रिपब्लिकन पक्षाचे सलग 20 वर्षे अध्यक्ष व चाकण विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले.

एमपीसी न्यूज- रिपब्लिकन पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव जाधव (वय 75) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

खेड तालुका रिपब्लिकन पक्षाचे सलग 20 वर्षे अध्यक्ष व चाकण विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. रिपाइंचे माजी तालुकाध्यक्ष संतोष जाधव व शाम जाधव यांचे ते वडील होत. चाकणमधील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.