BNR-HDR-TOP-Mobile

Chakan: ‘एमव्हीएमएल’ युनियनच्या अध्यक्षपदी सागर भोसले तर, सचिवपदी सुशांत मोहिते

एमपीसी न्यूज – चाकण एमआयडीसीतील एमव्हीएमएल कामगार असोशिएट्स युनियन पदाधिका-यांची निवडणूक नुकतीच पार पडली असून अध्यक्षपदी सागर मारूती भोसले, तर सचिवपदी सुशांत मोरेश्वर माहीते यांची निवड करण्यात आली आहे.

चाकण एमआयडीसीत महिंद्रा व्हेईकल मॅन्यूफॅक्चर लिमिटेड ही वाहन उद्योगातील एक अग्रगण्य कंपनी आहे. या कंपनीमध्ये एमव्हीएमएल कामगार असोशिएट्स युनियन कार्यरत असून त्याची त्रैवाषिक निवडणूक नुकतीच उत्साहात पार पडली.

  • दहा जागांच्या या निवडणूकीतील अध्यक्ष ते खजिनदार पदासाठी 19 तर, सदस्यपदासाठी 23 अशा एकूण 42 कामगारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. कंपनीतील 2370 कामगार मतदारांपैकी 2131 कामगारांनी मतदानाचा हक्क बजाविला.

त्यामध्ये अध्यक्षपदी सागर भोसले, तर सचिवपदी सुशांत मोहीते यांची निवड करण्यात आली आहे. उर्वरित पदाधिका-यांमध्ये विजय तुकाराम निंबळे (उपाध्यक्ष), रविंद्र मारूती काळभोर (सह सचिव), पवनकुमार सुभाष जाधव (खजिनदार), विक्रमसिंह आनंदा पाटील, सुयोग भालेकर, शंकर शांताराम ढमाले, सागर नंदलाल केवट आणि योगेश डावरे (सर्व सदस्य) यांचा समावेश आहे. अ‍ॅड. प्रशांत क्षिरसागर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3