Chakan : शेळ्यांनी झाडे खाल्ल्यामुळे ज्येष्ठ नागरिकास मारहाण

एमपीसी न्यूज – शेळ्यांनी झाडाची पाने आणि झाडे खाल्ल्याने चार जणांनी मिळून 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिकास आणि त्यांच्या मुलाला काठीने मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 17) सकाळी खेड तालुक्यातील पवळेवाडी येथे घडली.

धोंडिबा दादाभाऊ पवळे (वय 73, रा. पवळेवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरेश अनंता पवळे, शैला सुरेश पवळे, पप्पू सुरेश पवळे, अमित सुरेश पवळे (सर्व रा. पवळेवाडी, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवळे यांच्या शेळ्यांनी आरोपीच्या झाडांची पाने आणि झाडे खाल्ली. या कारणावरून आरोपी पप्पू याने फिर्यादी यांना काठीने डोक्यात मारले. आरोपी अमित याने फिर्यादी यांच्या मुलाला काठीने हातावर मारून जखमी केले. तर आरोपी सुरेश आणि शैला यांनी शिवीगाळ केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.