Chakan : अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून सात हजार लिटर हातभट्टी दारू जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पावणेतीन लाख रुपयांचे गावठी हातभट्टी दारू बनविण्याचे रसायन जप्त केले. ही कारवाई सोमवारी (दि. 28) दुपारी साडेचार वाजता खेड तालुक्यातील खराबवाडी येथे करण्यात आली.

राजू नवलसिंग राठोड (वय 40, रा. दावडमळा, चाकण) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई पांडुरंग फुंदे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील खराबवाडी येथे ओढ्याच्या कडेला एकजण बेकायदेशीररित्या गावठी दारू बनावत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून छापा मारला.

त्यात दोन लाख 80 हजार रुपयांचे सात हजार लिटर गावठी हातभट्टी तयार करण्याचे कच्चे रसायन मिळाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1