Chakan News : चाकण – शिक्रापूर मार्गावरील पीएमपीएमएल बंद

एमपीसी न्यूज : ग्रामीण भागातील वाहतुकी बाबत पीएमपीएमएलकडून मोठा निर्णय घेताना ग्रामीण भागातील 11 मार्गावरील पीएमपीएमएल बस सेवा बंद करण्यात आली आहे.(Chakan News) चाकण – शिक्रापूर मार्गावरील बससेवा देखील बंद करण्यात आल्याने विद्यार्थी, नागरिक, शेतकरी यांच्याकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

ग्रामीण भागात सुरू असलेल्या वाहतुकीमध्ये कमी उत्पन्न होत असल्याने पीएमपीएल कडून सदरच्या मार्गावरील सेवा बंद केली आहे. पीएमपीएल बंद होणार असली तरी  या मार्गांवर तत्काळ एसटी सेवा सुरु केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात शनिवार पासून बससेवा बंद करण्यात आली असली तरी केवळ याच मार्गावर धावणारी एसटी बस सेवा सुरु करण्यात आलेली नसल्याचे या मार्गावर प्रवास करणाऱ्या विद्यार्थी आणि नागरिकांनी संगितले.

Pune News : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने नागरिकांना लुटणार्‍या दोघांना अटक

पीएमपीएमएलने घेतलेल्या या निर्णयाचा ग्रमीण नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना त्रास होणार आहे.शनिवारी बससेवा बंद झाल्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी आणि नागरिकांचा खोळंबा झाल्याचे चित्र पहावयास मिळत होते. चाकण शिक्रापूर रस्त्यावरील मेदनकरवाडी फाटा, कडाचीवाडी, रासे, भोसे, शेलगाव, कोयाळी, वडगाव घेनंद, शेलपिंपळगाव, बहुळ, साबळेवाडी, चिंचोशी ते शिक्रापूर पर्यंतच्या अनेक गावांतून येणारे – जाणारे विद्यार्थी, कामगार, शेतकरी यांची परवड होणार आहे.

दरम्यान प्रशासनाच्या या निर्णयामुळे खाजगी प्रवाशी वाहतुकीला पुन्हा एकदा सुगीचे दिवस येणार आहेत. अशी खाजगी वाहने अव्वाच्या सव्वा पैसे उकळत असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे.

— 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.