Chakan : …म्हणून चाकण, एमआयडीसीतील वीज पुरवठा झाला होता खंडित

एमपीसी न्यूज – महापारेषण कंपनीच्या अतिउच्चदाब 220 केव्ही आळेफाटा उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे चाकण (Chakan) 132 केव्ही उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी चाकण शहर व एमआयडीसी परिसरातील सुमारे 40 हजार 350 घऱगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा शनिवारी (दि. 18) दुपारी 12.30 ते 1.05 वाजेपर्यंत बंद राहिला.

याबाबत माहिती अशी की, महापारेषण कंपनीच्या आळेफाटा 220/132 केव्ही उपकेंद्रातून 132 केव्ही वीजवाहिनीद्वारे चाकण 132 केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा केला जातो. आज दुपारी 12.30 च्या सुमारास आळेफाटा उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे सुमारे 48 मेगावॅट विजेची पारेषण तूट निर्माण झाली.

PCMC : अतिक्रमण कारवाईत जप्त केलेल्या मशीनचा हडपण्याचा डाव? कनिष्ठ अभियंता निलंबित

त्यामुळे भार व्यवस्थापनासाठी एलटीएस (Load Trimming Scheme) यंत्रणा कार्यान्वित झाल्यामुळे चाकण 132 केव्ही (Chakan) उपकेंद्राला होणारा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी चाकण उपकेंद्रातून महावितरणच्या 22 केव्हीच्या सात वीजवाहिन्यांचा देखील वीजपुरवठा खंडित झाला.

यामुळे चाकण शहर तसेच एमआयडीसी परिसरातील खराबवाडी, म्हाळुंगे, आंबेठाण, रोहकल, बिरदवडी, वाकी, ज्ञानेकरवाडी, कडाची वाडी या गावांतील 38 हजार घरगुती, वाणिज्यिक तसेच 2 हजार 350 औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा दुपारी 1 वाजेपर्यंत बंद राहिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.