Chakan: सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक वाडेकर (गुरुजी) यांचे निधन

Chakan: Social activist Valmik Wadekar (Guruji) passed away रासे गावचा इतिहास वाल्मिक वाडेकर (गुरुजी) यांनी पुस्तकरूपाने समोर आणला होता.

एमपीसी न्यूज – रासे (ता.खेड) येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक रघुनाथ वाडेकर (गुरुजी ) (वय 72) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.  अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वाडेकर गुरुजी यांचा विविध सामाजिक संस्था संघटनांशी जवळचा संबंध होता.  रासे गावचा इतिहास त्यांनी पुस्तकरूपाने समोर आणला होता.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. चाकण औद्योगिक वसाहतीतील येथील ज्येष्ठ कामगार नेते अविनाश वाडेकर यांचे ते वडील होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.