Chakan Crime News : गुटखा साठवणूक आणि विक्री प्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाची दोन ठिकाणी कारवाई; 17 लाख 89 हजारांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने चाकण परिसरात गुरुवारी (दि. 29) प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवल्याबाबत दोन ठिकाणी छापे मारले. या दोन्ही कारवायांमध्ये 17 लाख 89 हजार 592 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुरुवारी दुपारी साडेपाच वाजता बिरदवडी, चाकण येथील आंबेठाण ते वासुली फाटा रोडवरील महिंद्रा सीआई कंपनीच्या पार्कीगमध्ये पहिली कारवाई करण्यात आली.

एका चॉकलेटी रंगाच्या टाटा कंपनीच्या चारचाकी गाडी (एम एच 14 / जी यु 6821)मध्ये तंबाखूजन्य गुटख्याची आजुबाजुच्या परिसरामध्ये विक्री करण्याच्या उद्देशाने एका व्यक्तीने साठवणूक केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या करवाईमध्ये 10 लाख 11 हजार 600 रुपये किमतीचा तंबाखूजन्य गुटखा, 2 लाख 90 हजारांची एक गाडी असा 13 लाख एक हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी वाहन चालक अभिषेक विलास सोनवणे (वय 21, रा. मेदनकरवाडी, बालाजीनगर, चाकण ता. खेड, जि. पुणे), अनुराग अजयनारायण पंडीत (वय 26, रा. दवने वस्ती, महाळुंगे ता. खेड जि. पुणे. मुळपत्ता कुढोंढ ता. जालोम जि. जालोन राज्य उत्तरप्रदेश), पाहिजे आरोपी गुटखा मालक कल्लु गुप्ता (वय अंदाजे 40, रा. देवेंद्र अपार्टमेंटच्या पाठीमागे, चाकण-शिक्रापूर रोड, चाकण ता. खेड जि. पुणे) यांच्या विरोधात महाळुंगे (ई) पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी कारवाई गुरुवारी साडेसहा वाजताच्या सुमारास हनुमंत भिकाजी मेदनकर यांचे राहते घराचे बिल्डींगमधील रुम नंबर एक, पी के कॉलेज रोड, मेदनकरवाडी, चाकण येथे करण्यात आली. विक्रीसाठी गुटखा साठवून ठेवल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये 4 लाख 87 हजार 992 रुपयांचा तंबाखूजन्य गुटखा जप्त केला आहे.

याप्रकरणी सौरभ रनविजय तिवारी (वय 26, रा. पी. के. कॉलेज जवळ, मेदनकरवाडी, चाकण ता. खेड जि. पुणे), पवनसिंग रघुविर सिंग (वय 28, रा. देवेंद्र पार्क कडाचीवाडी, चाकण ता. खेड जि. पुणे), पाहिजे आरोपी कृष्णमुरारी उर्फ कल्लु गुप्ता (वय 36, रा. देवेंद्र पार्क कडाचीवाडी, चाकण ता. खेड जि. पुणे), अंकुर गुप्ता (वय 38, रा. बिरदवाडी, चाकण ता. खेड जि. पुणे), हनुमंत भिकाजी मेदनकर (वय 35, रा. मेदनकरवाडी ता. खेड जि. पुणे) यांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही कारवाईमध्ये एकूण 17 लाख 89 हजार 592 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, धैर्यशिल सोळंके, पोलीस अंमलदार सुनिल शिरसाट, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, भगवंता मुठे, अनिल महाजन, राजेश कोकाटे, जालिंदर गारे, सोनाली माने यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.