Chakan : किरकोळ कारणावरून मुलाने केले भाऊ आणि वडिलांवर चाकूने वार

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून मुलाने भाऊ आणि वडिलांवर चाकूने वार केले. ही घटना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास खेड तालुक्यातील खराबवाडी येथे घडली.

निलेश मुरलीधर भांबेरे (वय 30, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) त्यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गणेश मुरलीधर भांबेरे (रा. खराबवाडी), सासरे महादेव गीते (रा. चिंचोली, ता. शेगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश आणि गणेश यांच्यामध्ये घरगुती कारणावरून वाद झाला. त्यामुळे गणेशला समजावून सांगण्यासाठी त्यांचे वडील मुरलीधर भांबेरे व मामा मुरलीधर कडू गणेशच्या घरी गेले. समजावून सांगत असताना त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यावेळी गणेशचे सासरे महादेव हे देखील तिथे होते. गणेश आणि सासरे महादेव या दोघांनी मिळून गणेशच्या वडिलांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच निलेश आणि त्याच्या वडिलांवर चाकूने वार केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.