Chakan : महावितरणकडून चाकण उपविभागाचे विभाजन; नवीन चाकण एमआयडीसी उपविभागाची निर्मिती

एमपीसी न्यूज – महावितरणने चाकण उपविभागाचे विभाजन केले आहे. नव्या रचनेत ( Chakan) चाकण एमआयडीसी उपविभाग आणि अंतर्गत वासूली व निघोजे या दोन शाखा कार्यालयांची निर्मिती केली आहे. नवीन उपविभाग व दोन शाखा कार्यालयांसाठी एकूण 36 तांत्रिक व अतांत्रिक पदे मंजूर करण्यात आले असून येत्या मार्चच्या पहिल्या आठवड्यात ही कार्यालये सुरु होतील.

महावितरणच्या राजगुरुनगर विभागामध्ये सध्या चाकण, लोणावळा, तळेगाव, वडगाव मावळ आणि राजगुरुनगर असे पाच उपविभाग आहेत. यात चाकण उपविभाग अंतर्गत एकूण पाच शाखा कार्यालय आहेत. चाकण उपविभागातील 1 लाख 13 हजार ग्राहकांमध्ये चाकण एमआयडीसी परिसरात सुमारे 7 हजार 800 उच्च व लघुदाबाचे उद्योग आहेत.

महावितरणकडून चाकण एमआयडीसीसह उपविभागातील सर्व ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये विद्युत यंत्रणा सुधारणा योजने अंतर्गत चाकण एमआयडीसीमध्ये 15 कोटी 49 लाख रुपये खर्चाच्या मंजूर आराखड्यातील प्रामुख्याने किंग्फा व ह्युंदाई 22/22 केव्ही स्विचिंग स्टेशन गेल्या डिसेंबर मध्ये एकाचवेळी कार्यान्वित करण्यात आले आहे.

Nigdi : आता दर रविवारी निगडी ते सिंहगड पायथा थेट बससेवा सुरु

आता चाकण उपविभागाचे विभाजन करून नवीन चाकण एमआयडीसी उपविभाग तयार करण्यात आला आहे. नव्या रचनेत पूर्वीच्या चाकण उपविभागात (कंसात ग्राहकसंख्या) चाकण शहर (27654), भोसे (10746), आळंदी शहर (23759) आणि आळंदी ग्रामीण (8315) ही चार शाखा कार्यालय व एकूण 70 हजार 574 ग्राहकसंख्या असेल. तर नव्या चाकण एमआयडीसी उपविभागात चाकण ग्रामीण (19163), वासूली (8206), निघोजे (14934) हे तीन शाखा कार्यालय व एकूण 42 हजार 303 ग्राहक असतील.

चाकण एमआयडीसी उपविभाग कार्यालयासाठी उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक लेखापाल चे प्रत्येकी एक पद, निम्नस्तर व उच्चस्तर लिपिकांचे 6 पदे तसेच मुख्य तंत्रज्ञ, शिपाईचे प्रत्येकी एक पद असे 12 पदे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच नव्या वासूली व निघोजे शाखा कार्यालयांमध्ये सहायक अभियंता, प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ व तंत्रज्ञ असे प्रत्येकी 12 पदे मंजूर करण्यात ( Chakan) आले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.