Chakan: कंपनीच्या स्टोअर रूममधून चार लाखांची केबल चोरीला

Chakan: Stolen cables worth Rs four lakh from company's store room बुधवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास तीन ते चार अनोळखी इसमांनी म्हाळुंगे येथील एच आर मिंडा कंपनीच्या वायरिंग हार्नेस डिव्हिजनमध्ये प्रवेश केला.

एमपीसी न्यूज- कंपनीच्या स्टोअर रूममधून अज्ञात तीन ते चार जणांनी मिळून चार लाख 7 हजार 669 रुपयांची केबल वायर चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 22) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमरास एच आर मिंडा कंपनी येथे घडली.

अजरुद्दिन बादशाह मुजावर (वय 38, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात तीन ते चार इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास तीन ते चार अनोळखी इसमांनी म्हाळुंगे येथील एच आर मिंडा कंपनीच्या वायरिंग हार्नेस डिव्हिजनमध्ये प्रवेश केला.

स्टोअर रूम मधून चार लाख 7 हजार 669 रुपये किमतीचे केबल वायरचे 90 बंडल चोरट्यांनी चोरून नेले. याबाबत बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.