Chakan : ट्रक अडवून पावणे आठ लाखांचा माल लुटला; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – अ‍ॅल्युमिनिअमचे गट्टू घेऊन जाणारा ट्रक चौघांनी अडवला. चालकाला थांबवून ट्रक नेऊन त्यातील पावणे आठ लाख रुपयांचा माल चोरून ट्रक परत केला. हा प्रकार शुक्रवारी (दि. 7) पहाटे खेड तालुक्यातील बहुळ फाटा येथे घडला.

लक्ष्मण विष्णू वरवडे (वय 32, रा. रांजणगाव. ता. शिरूर, मूळ रा. वडवणी, जि. बीड) (ट्रकचालक) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मोमीन काझी (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) आणि त्याचे तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लक्ष्मण ट्रकचालक आहेत. गुरुवारी रात्री ते रांजणगाव एमआयडीसी येथील क्लिंगर ऑटोमोटिव्ह कंपनीमधून अ‍ॅल्युमिनिअमचे गट्टू हिंदानको इंडस्ट्रीज लि. अंधेरी मुंबई येथे ट्रक (एम एच 12 / पी क्यू 8969) मधून घेऊन जात होते. ट्रकमध्ये 7 हजार 17 किलो वजनाचे 7 लाख 71 हजार 870 रुपये किमतीचे अ‍ॅल्युमिनिअमचे गट्टू होते.

खेड तालुक्यातील बहुळ फाटा येथे चार जणांनी त्यांचा ट्रक अडवला. आरोपींनी लक्ष्मण यांना मारहाण आणि दमबाजी करून ट्रक आणि मोबाईल फोन नेला. काही वेळाने आरोपींनी ट्रकमधील माल चोरून ट्रक व मोबाईल फोन परत आणून दिला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.