Chakan : किरकोळ कारणावरून तलवार उगारत एकाला मारहाण

एमपीसी न्यूज – तलवार घेऊन अंगावर धावून जात शिवीगाळ करत एकाला मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 17) रात्री आठच्या सुमारास खेड तालुक्यातील थोपटवाडी, करंजविहीरे येथे घडली.

उत्तम ज्ञानेश्वर कोळेकर (वय 52, रा. थोपटवाडी, करंजविहीरे, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अरुण बाबुराव करंडे (वय 47, रा. धामणे, ता. खेड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री आरोपी फिर्यादी यांच्या घरासमोर आला. तु माझ्या मुलाला फुस का लावली. तुला मी सोडणार नाही. असे म्हणत आरोपी तलवार घेऊन फिर्यादी यांच्या अंगावर धावून आला. फिर्यादी यांच्या अंगावर तलवार उगारून आरोपीने शिवीगाळ करत दमदाटी केली.

तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून निघून गेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला समजपत्र देऊन सोडले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.