Chakan : हंडाभर पाण्यासाठी झुंबड …; आदिवासी वस्त्यांवरील स्थिती

एमपीसी न्यूज – चाकण परिसरातील वाड्या-वस्त्यांच्या भागात विहिरी आणि कुपनलिकांनी (बोरवेल) पाण्याचा तळ गाठल्याने ग्रामस्थांवर पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. आदिवासी ठाकर, कातकरी महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

चाकणमधील कातकरी वस्तीवरही अशीच स्थिती आहे. हंडाभर पाणी मिळविण्यासाठी अनेक ठिकाणी झुंबड उडत आहे. एकूणच पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.