Chakan: नागरिकांनी अनुभवला चित्तथरारक ‘स्टंट शो’

एमपीसी न्यूज – आपल्या चाहत्यांसाठी केटीएम या रेसिंग ब्रॅन्ड तर्फे चाकण येथे चित्तथरारक ‘स्टंट शो’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये व्यावसायिक स्टंट कलाकार सहभागी झाले होते. चाहत्यांना प्रतीक्षेत असलेली ड्यूक 125 एबीएस बघण्याची संधी या निमित्ताने नागरिकांना मिळाली.

यावेळी बजाज ऑटो लिमिटेडच्या प्रो बायकिंगचे प्रेसिंडेंट अमित नंदी यांनी सांगितले, ‘केटीएम हा ब्रॅन्ड हाय परफॉर्मन्स रेसिंग बाईक म्हणून प्रसिध्द आहे. व्यावसायिक स्टंट्सचे हे कार्यक्रम विविध शहरांत होणार असून, भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यामुळे ग्राहकांना अनोखा केटीएम अनुभव मिळेल”.

”हा कार्यक्रम शहरांतील लोकांसाठी खुला असणार आहे. आजपर्यंत अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन कांचीपुरम, कोईम्बतूर, चेन्नई, विजयपूर, लखनौ, इंदूर, औरंगाबाद, जम्मू, राजकोट, जालंधर, जोधपुर, अंकलेश्वर, कल्याण, सांगली, सातारा, भिवंडी या शहरात करण्यात आले होते”, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.