Chakan : कंपनीत मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे कामगाराची आत्महत्या

Suicide of a worker due to abusive treatment received in the company

एमपीसी न्यूज – कंपनीत वरिष्ठांकडून मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे एका कामगाराने राहत्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

ही घटना ईएमडीईपी टेस्ट बोर्ड प्रा. ली. निघोजे येथे 21 नोव्हेंबर 2019 रोजी आणि त्यापूर्वी दोन वर्षांपासून घडली. याबाबत 26 मे 2020 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयूर मधुकर वाघ असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे वडील मधुकर खंडेराव वाघ (वय 62, रा. मोशी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रशांत महावीर सूर्यवंशी, सुशील अशोक कांबळे, अक्षय कोठावळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मयूर वाघ हे निघोजे येथील ईएमडीईपी टेस्ट बोर्ड प्रा. ली. कंपनीत कामाला होते. आरोपी प्रशांत कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करतो.

आरोपींनी आपसात संगनमत करून मयूर यांना कामावरून अपमानास्पद वागणूक दिली. आरोपींच्या त्रासाला कंटाळून मयूर यांनी ते राहत असलेल्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.