BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : स्विफ्ट मोटारीच्या धडकेत महिलेचा मृत्यू; काळूस येथील घटना

958
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पंचावन्न वर्षीय महिलेस स्विफ्ट मोटारीची जोरदार धडक बसल्याने त्यांचा अपघातात मृत्यू झाला. हि घटना चाकण-काळूस रस्त्यावरील काळूस (ता. खेड) गावच्या हद्दीत बुधवारी (दि. ६ फेब्रुवारी) दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान घडली.

गोपाबाई सीताराम पोटवडे (वय – ५५ वर्षे, रा. पवळेवस्ती, काळूस, ता. खेड) असे या अपघातात जागीच ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत गणेश तुकाराम पवळे (वय – ३८ वर्षे, रा. पवळेवस्ती, काळूस, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

याबाबत मिळालेली माहिती अशी, चाकण ते काळूस या रस्त्यावर काळूस गावच्या हद्दीत अगदी रस्याच्या कडेला गोपाबाई हया बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान उभ्या होत्या. त्यावेळी चाकण बाजूकडून काळूस गावाकडे भरधाव निघालेल्या स्विफ्टची (एम.एच.०४, बी.एच.४०७७ ) त्यांना जोराची धडक बसली. यात गोपाबाई जागीच ठार झाल्या. चाकण पोलिसांनी याप्रकरणी स्विफ्ट चालकावर (नाव, गाव आणि पत्ता निष्पन्न नाही) गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.