BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : चाकण एमआयडीसीमध्ये मतदानाची शपथ

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- चाकण औद्योगिक वसाहतीत मतदारांमध्ये जागृती व्हावी, या उद्देशाने सोमवारी ( दि.१५) मतदानाची शपथ घेण्यात आली. भविष्य निर्वाह निधी कार्यालय, कामगार कार्यालय पुणे विभाग यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात जवळपास शंभर कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला.

प्रत्येक सज्ञान नागरिकाला भारतीय संविधानाने मतदान करण्याचा समान हक्क प्रदान केलेला आहे. येत्या २९ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करावे व इतरांनाही मतदान करण्याबाबत जागृती करावी, असे आवाहन यावेळी पुणे विभागाच्या भविष्य निर्वाह निधी व कामगार कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी केले.

  • फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सदस्य असलेल्या अनेक कंपन्यांनी यावेळी सर्व कंपन्यांत मतदान करण्याच्या बाबत जनजागृती करणार असल्याचे यावेळी सांगितले. चाकणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास चाकण एमआयडीसी मधील स्पायसर, गॅब्रीएल, बेहर, महिंद्रा, मुंगी इंजी., एस.के.एस., फोकस वेगन, इंडूरन्स, बडवे इंजी. बजाज ऑटो,ब्रिजस्टोन, बॉश, फोर्स मोटर्स, ह्युंदाई, कॉर्निंग इंडिया आदी अनेक कंपन्यांतील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

 

दरम्यान, मतदानाच्या दिवशी बहुतांश वेळा अनेक कंपन्यांमध्ये कामगार व व्यवस्थापनातील मंडळीना मतदान करण्यासाठी सुट्टी दिली जात नसल्याचा किंवा मतदान करण्यासाठी काही तास सुटी देऊन उत्पादन सुरु ठेवण्यात येत असल्याचा आक्षेप अनेकदा घेतला जातो. आता या माध्यमातून कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच मतदानाची शपथ घेतल्याने कामगार व व्यवस्थापनातील सर्वाना यावेळी मतदानाच्या दिवशी खरोखर पुरेशी सुटी मिळेल अशी सर्वाना अपेक्षा आहे.

HB_POST_END_FTR-A4

.