Chakan Talegaon Crime : बाललैंगिक अत्याचार प्रकरणी तरुणीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पीडित मुलगा अल्पवयीन आहे (Chakan Talegaon Crime) हे माहित असताना देखील त्याला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याप्रकरणी 20 वर्षीय तरुणीवर महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार एप्रिल 2022 मध्ये चाकण – तळेगाव परिसरात घडला.

याप्रकरणी महाळुंगे पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.5) फिर्याद दिली असून 20 वर्षीय तरुणीवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Chinchwad : अपघाताचा बनाव करत तरुणाला मारहाण करत लुटले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व संबंधीत तरुणीची ओळख झाल्यानंतर (Chakan Talegaon Crime) ते फोनवरून बोलत होते. यावेळी पीडित मुलाला तरुणीने फिरायला जाण्यासाठी बोलावले. त्यानुसार मुलगा व आरोपी तरुणी खराबवाडी जवळील पेट्रोल पंपाजवळ भेटले व चालत-चालत एका शेताजवळ गेले व बसले. तेथे तरुणीने पीडित मुलाशी गैरवर्तन करत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले. यावरून महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.