Chakan : दारूची बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – दारूची बेकायदेशीरपणे वाहतूक केल्या प्रकरणी चाकण पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक कार आणि हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 16) पहाटे पावणे सहा वाजता खेड तालुक्यातील दत्तवाडी, शेलगाव येथे करण्यात आली.
Hinjawadi : मेट्रो साईटवरून टेम्पोसह सव्वा पाच लाखांचे साहित्य चोरीला
तेजस जीवन मन्नावत (वय 22, रा. चिखली, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार निखील वर्पे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्याच्या कार (एमएच 12/बीव्ही 2124) मधून हातभट्टीची दारूची विक्रीसाठी वाहतूक करीत होता. चाकण पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तेजस याला कार सह ताब्यात घेतले. कारची पाहणी केली असता त्यात 20 हजार रुपये किमतीची दारू आढळली. पोलिसांनी दारू आणि एक लाख 50 हजार रुपये किमतीची कार जप्त केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.