गुरूवार, डिसेंबर 8, 2022

Chakan Tax : चाकणकरांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन अन्यायकारक करवाढीची तक्रार

एमपीसी न्यूज : भाडे मूल्य आधारित कर मूल्य (Chakan Tax) निर्धारण होईल तेव्हाच चाकण नगरपरिषदेकडून त्याप्रमाणे आकारणी व्हावी, अशी मागणी चाकणकर नागरिकांनी पुण्याच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी या बाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना मंगळवारी (दि. 27) दिले.

Talegaon Dabhade : श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची गुरुवारी सर्वसाधारण सभा

जिल्हाधिकारी कार्यालयात करवाढ आकारणी विरोधात तक्रारी करण्यात आल्या. चाकण शहरातील सर्व 26 हजार बांधकाम मिळकतीना ग्रामपंचायतप्रमाणे कर आकारणी (Chakan Tax) करून नियमानुसार टप्पा टप्प्याने कर आकारणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. राज्यातील सर्व नवनिर्मित नगरपरिषद यांना जेव्हा भाडे मूल्य आधारित कर मूल्य निर्धारण होईल तेव्हाच चाकण नगरपरिषदेकडून त्याप्रमाणे आकारणी व्हावी अशी मागणी यावेळी माजी जि.प.सदस्य किरण मांजरे, कृती समितीचे कुमार गोरे, राम गोरे, अशोक बिरदवडे, कालिदास वाडेकर, जमीर काझी, बाळासाहेब गायकवाड, अॅड. निलेश कड, संजय गोरे, दत्ता गोरे, मुबीन काझी, अमोल जाधव आदींनी केली. या बाबतचे निवेदन देखील देण्यात आले आहे.

Latest news
Related news