Chakan : भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू

Tempo hit the bike, one dead

एमपीसी न्यूज -भोसरीला जाणार्या दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव जाणाऱ्या टेम्पोने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकी चालकाच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. हा अपघात मोई गावाच्या जवळ चिखली गावाकडे जाणार्या रस्त्यावर शुक्रवारी (दि.9) रात्री नऊच्या सुमारास घडला.

याप्रकरणी दुचाकी चालक रमाकांत उद्धव बेहेरा ( वय. 50, व्यवसाय – वर्कशॉप, रा. आदर्श नगर, मोशी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी टेम्पोच्या अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रमाकांत हे आपली दुचाकी ( एमएच 14 बीडब्लु 7562 ) वरून पत्नी भानुप्रिया रमाकांत बेहेरा (वय.45) यांना मागे बसवून भोसरीला जात होते. दरम्यान, इंद्रायणी नदी जवळ एटीसी एनसोस या कंपनीच्या समोर भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने बेहेरे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकी चालक रमाकांत बेहरे हे गंभीर जखमी झाले तर पाठीमागे बसलेल्या त्यांच्या पत्नी भानुप्रिया बेहेरे यांचा मृत्यू झाला.

चाकण पोलीसांनी अज्ञात टेम्पो चालका विरूद्ध गुन्हा दाखल केला असून. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.