BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक करताना पोलिसांना धक्काबुक्की

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – खुनाचा प्रयत्न या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक कारण्यासाठी गेलेल्या पोलिसांना आरोपी आणि त्याच्या घरच्यांनी अरेरावी करत धक्काबुक्की केली. पोलीस करत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला. ही घटना शनिवारी (दि. 5) दुपारी बाराच्या सुमारास खेड तालुक्यातील रासे येथे घडली.

नितीन घोडके (वय 24), संपत काळुराम शिंदे (वय 31), अनिकेत घोडके (सर्व रा. रासे, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाचा प्रयत्न गुन्ह्यातील फरार आरोपीचा चाकण पोलीस शोध घेत होते. पोलिसांना माहिती मिळाली की, फरार आरोपी रासे गावात आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस नाईक सातकर, महिला पोलीस शिपाई कोहोकडे, पोलीस हवालदार राजपूत यांचे पथक तिथे जाऊन आरोपीला ताब्यात घेत असताना नितीन घोडके, संपत शिंदे, अनिकेत घोडके यांनी पोलिसांशी हातापायी केली. आरोपींनी पोलिसांशी धक्काबुक्की करत अरेरावीची भाषा वापरून शिवीगाळ केली.

‘तुम्ही अनिकेतला कसे घेऊन जाता हेच पाहतो, दंगलीच्या वेळी पोलिसांची काय गत झाली होती, तशी तुमची दाणादाण करून टाकू’ …! असे म्हणत सरकारी कामात अडथळा आणला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून नितीन आणि संपत या दोघांना अटक करण्यात आली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.