Chakan : जाब विचारल्याच्या रागातून दुचाकी पेटवली

एमपीसी न्यूज – मोठ्याने शिव्या देण्याचा जाब विचारल्याने (Chakan)एकाने जाब विचारणाऱ्या तरुणाची दुचाकी पेट्रोल ओतून जाळून टाकली. ही घटना बुधवारी (दि. 29) पहाटे चार वाजताच्या सुमारास चाकण मधील खंडोबा माळ येथे घडली.

समीर रेहमत अन्सारी (रा. खंडोबा माळ, चाकण) याला पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे. याबाबत 57 वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri : “माझी वसुंधरा” पर्यावरणपूरक अभियान प्रभावीपणे राबविण्याची मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (Chakan)यांच्या मुलाने मागील दीड महिन्यापूर्वी आरोपी समीर याला मोठ्याने शिव्या का देतो, असा जाब विचारला होता. त्या रागातून समरी याने फिर्यादी यांच्या मुलाची 70 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14/डीएस 1630) पेट्रोल ओतून जाळून टाकली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.