Chakan : कंपनीसाठी शेड घेण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची दहा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – एका कंपनीला भाड्याने शेड हवे होते. त्यासाठी एका व्यावसायिकाकडून कंपनीच्या भागीदारांनी शेड तयार करून ते भाड्याने घेण्याचे ठरवले. त्याबदल्यात योग्य भाडे देण्याचे ठरले. मात्र, शेड तयार कराताना अनेक अटी घालून शेडच्या खर्चात वाढ केली. त्यामुळे व्यावसायिकाने कंपनीकडे भाडे वाढवून मागितले. त्यावर कंपनीने शेड भाड्याने घेणार नसल्याचे सांगत व्यावसायिकाची दहा लाखांची फसवणूक केली.

राजेश जगदीशप्रसाद अग्रवाल (वय 43, रा. एम्पायर इस्टेट, चिंचवड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रशांत वसानी (रा. एम्पायर इस्टेट, चिंचवड), पॉल हलास (वय 39, रा. एरंडवणा, पुणे), दिनेश दिलीप कस्तुरे (वय 36, रा. सिंहगड रोड, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची एसपीसी नावाची कंपनी आहे. या कंपनीसाठी शेड भाड्याने हवे होते. त्यासाठी त्यांनी राजेश यांना विचारले. राजेश यांचे भांबोली गावाच्या हद्दीत चाकण एमआयडीसीमध्ये असेलेले एक शेड विकसित करून त्या कंपनीला द्यायचे ठरले. राजेश यांनी शेड विकसित करून द्यायचे. त्याबदल्यात आरोपी त्यांना 22 रुपये प्रति चौरस फूटप्रमाणे भाडे देणार होते.

शेड विकसित करत असताना आरोपींनी राजेश यांना खर्चिक बांधकाम करण्यास सांगितले. बांधकाम अत्यंत खर्चिक असल्याने त्यांनी कंपनीकडे मेलद्वारे विचारणा केली की ‘वाढीव खर्चाची काही रक्कम कंपनीने भरावी, अथवा भाडे वाढवून द्यावे’. कंपनीने राजेश यांच्या दोन्ही पर्यायांना केराची टोपली दाखवत नकार दिला.

  • तसेच करारनाम्यातील अटींचा भंग केल्याबाबत न्यायालयात जाणार असल्याची राजेश यांना धमकी दिली. शेड तयार करण्यासाठी राजेश यांना दहा लाख रुपयांचा खर्च आला. एवढा खर्च करून आरोपींनी शेड भाड्याने घेतले नाही. याबाबत तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.