Chakan : सर्वांना मुलभूत अधिकाराची माहिती व्हावी म्हणून देशभर संविधान सन्मान मेळाव्याची गरज -चंद्रकात हंडोरे

चाकणला संविधान सन्मान मेळावा उत्साहात; चाकणला भीमशक्तीचा कार्यक्रम

एमपीसी न्यूज – संविधानात भारतात जन्म घेणाऱ्या प्रत्येक नागरिकाला हे मुलभूत अधिकार संविधानाने बहाल केले आहेत. पण, दुर्देवाने हे मूलभूत हक्क बऱ्याच नागरिकांना आज देखील माहिती नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वंकष अभ्यासातून संविधानाच्या माध्यमातून दिलेले मुलभूत अधिकाराची सर्वांना माहिती असावी म्हणून देशभर संविधान सन्मान मेळावे घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी सामाजिक न्याय मंत्री आणि भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांनी केले.

पुणे जिल्हा भीमशक्ती संघटनेच्या वतीने चाकण येथे सोमवारी (दि.११) संविधान सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना चंद्रकांत हंडोरे बोलत होते.

  • यावेळी भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष विजय डोळस, संघटक अमित मेश्राम, जिल्हा कॉंग्रेसचे महेश ढमढेरे, विक्रांत भोर, आंबेगाव कॉंग्रेसचे अध्यक्ष राजूभाई इनामदार, भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कौदरे, राजगुरुनगर सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष किरण आहेर, चाकणचे नगराध्यक्ष शेखर घोगरे, नितीन जगताप, जमीर काझी, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण दुधवडे, नगरसेविका स्नेहा जगताप, भीमशक्तीच्या उषा उनवणे, सुनंदा शिदे, जाकीर अन्सारी, नितीन भद्रिके, संतोष जाधव, राहुल गोतारणे, सतीश आगळे, अक्षय घोगरे, अनिल जाधव, विलास रोकडे, राहुल डोळस यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेळाव्याच्या सुरुवातीला चाकण शहरातून भव्य संविधान यात्रा काढण्यात आली होती.

  • मेळाव्यात चंद्रकात हंडोरे म्हणाले की, प्रत्येक भारतीयाला संविधानाची किमान माहिती असायलाच हवी. समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत संविधान पोहोचवणे आणि त्यानुसार प्रत्येकाला आपला मूलभूत अधिकार मिळालाच पाहिजे. या देशातील चातृवर्ण नष्ट झाली पाहिजे. या देशात कायदा सुरु झाला पाहिजे, अशी भावना डॉ. बाबासाहेबांची होती.

भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष विजय डोळस म्हणाले, डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत अशा विचारधारेवर चालणारी भीमशक्ती संघटनेची चंद्रकांत हंडोरे यांनी २००२ मध्ये स्थापना केली. त्या माध्यमातून सर्व सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम केले जात आहे.

  • घटनेतील मुलभूत हक्क, अधिकार यामुळे सर्वांना समान वागणूक मिळत आहे. मात्र, काही नेते राजकारण करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. यावेळी अमित मेश्राम, महेश ढमढेरे, राजू इनामदार, मच्छिंद्र गोरे, जमीर काझी, निलेश कड यांनी मनोगत व्यक्त केले.
चाकण : शहरातून काढण्यात आलेली रॅली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.