Chakan : रास्ता ओलांडताना कारच्या धडकेत जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या कारने रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना 25 मार्च रोजी चाकण येथे घडली.

भागोजी बाबूराव जरे (रा. वाकी, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे 25 मार्च रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास भागोजी रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या कारने त्यांना धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते..

मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.