Chakan : कारच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या कारच्या धडकेत रस्ता ओलांडत असलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 4) रात्री साडेआठच्या सुमारास घडला.

रामेश्वर चौथुजी जाजोट (वय 60, रा. काळभोरनगर, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा नोंदवला.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक-पुणे रोडवर रामेश्वर जाजोट खेड तालुक्यातील कुरुळी येथे ओम लॉजिस्टिक कंपनीसमोर रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या कारने त्यांना धडक दिली.

यामध्ये रामेश्वर गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती न देता कार चालक पळून गेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.