BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : कंटेनरच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – दुचाकीवरुन जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना सहा मे रोजी खेड तालुक्यातील शेलगाव येथे घडली.

काळूराम पंढरीनाथ शिंदे (वय 65, रा. दावडी, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. चाकण पोलिसांनी अज्ञात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा मे रोजी सकाळी पावणेबाराच्या सुमारास काळूराम त्यांच्या दुचाकीवरून शिक्रापूर ते चाकण या मार्गावरून जात होते. शेलगाव येथील नदीजवळ आले असता भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

यामध्ये काळूराम गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2