BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : टेम्पो मागे घेताना शौचास बसलेल्या ज्येष्ठ इसमाचा मृत्यू

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – मालवाहू टेम्पोचालकाने अचानक टेम्पो पाठीमागे (रिव्हर्स) घेतल्याने जोरदार धडक बसून टेम्पोच्या पाठीमागील बाजूस शौचास बसलेल्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. हि घटना बिरदवडी (ता. खेड) येथे शुक्रवारी (दि.५) सायंकाळी सहाचे सुमारास घडली.

कांताराम गेनुजी जाधव ( वय ९० , रा, बिरदवडी , ता. खेड) या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे.

याप्रकरणी महाळुंगे (ता. खेड) पोलीस चौकीत (एमएच १४ जीडी ७७ १५) टेम्पोचालक दगडू रामचंद्र पवार (रा. बिरदवडी, ता. खेड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

HB_POST_END_FTR-A1
.