Chakan : कामगारांना पैसे देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याची दुचाकी पळवली

एमपीसी न्यूज – कामगारांना खर्चासाठी पैसे देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याची दुचाकी अज्ञातांनी पळवून नेली. ही घटना 9 मे रोजी रात्री मोई गावात भैरवनाथ मंदिरासमोर घडली. याबाबत 14 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरुण अशोक फलके (वय 36, रा. मोई, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी फलके हे शेतकरी आहेत. त्यांच्याकडे कामाला असलेल्या कामगारांना खर्चासाठी पैसे द्यायला ते 9 मे रोजी रात्री साडेनऊ वाजता गेले होते. त्यांनी मोई गावातील साबळेवाडी येथील भैरवनाथ मंदिरासमोर त्यांची 25 हजार रुपये किमतीची दुचाकी  (एमएच 14 / एचजे 3714) पार्क केली.

फलके पैसे देण्यासाठी गेले असताना दुचाकीची चावी दुचाकीलाच होती. अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून नेली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.