Chakan : भांडणाच्या रागातून किरकोळ कारणावरून वाद झालेल्या मुलाच्या वडिलांचा खून

एमपीसी न्यूज – चार महिन्यांपूर्वी मुलासोबत किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाच्या कारणावरून एका तरुणाने वाद झालेल्या मुलाच्या वडिलांचा धारदार शस्त्राने वार करत खून केला. ही घटना रविवारी (दि. 3) दुपारी तीनच्या सुमारास खराबवाडी येथे घडली.

विजय लक्ष्मण गायकवाड (वय 42, रा. खराबवाडी ता. खेड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नी सुनिता विजय गायकवाड (वय 39) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मुकेश लक्ष्मण घोलप (वय 23, रा. खराबवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुकेश याचे मयत विजय यांचा मुलगा दीपक याच्याशी किरकोळ कारणावरून मागील चार महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मुकेश याच्या मनात होता. त्यातूनच आरोपी मुकेश याने रविवारी दुपारी तीनच्या सुमारास विजय यांच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करून खून केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नसून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like