Chakan : उद्योग सुरू झाले पण कामगारांच्या तुटवड्यामुळे उद्योजक हैराण

Chakan: The industry started but there is a shortage of workers

0

एमपीसी न्यूज – चाकण परिसरातील उद्योग सुरू होऊन जवळपास तीन आठवडे उलटून गेले सरकारने 33% मनुष्यबळाच्या उपस्थितीत उद्योग सुरू करण्याची परवानगी दिली आहे, मात्र कोरोना विषाणूच्या भीतीने गावी परतलेल्या कामगारांमुळे कंपनीत कामगारांचा तुटवडा भासत आहे.

उद्योगांना चालना देण्यासाठी चाकण परिसरातील मोठ्या प्रमाणात उद्योगांना काम सुरू करण्याची परवानगी सरकारने दिली आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक नुकसान झालेल्या उद्योगांनी  33% मनुष्यबळाच्या उपस्थितीत उद्योग सुरू केले, मात्र तीन आठवड्यांनंतर सुद्धा उद्योगांना कामगारांची कमतरता भासत आहे.

कोरोनाच्या अभूतपूर्व संकटामुळे मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगार व इतर जिल्ह्यांतील कामगार आपल्या गावी परतले त्यामुळे उद्योग पुन्हा सुरू झाले असले तरी त्यांना कामगारांची कमतरता भासत आहे. काही ठिकाणी कामगार पूर्वी पेक्षा जास्त पगाराची अपेक्षा करत आहेत. स्थानिक कामगार वगळता जवळपास 80% कामगार आपल्या मूळ गावी परतले असल्यामुळे उद्योगांना कामगारांचा तुटवडा भासत आहे.

सूक्ष्म उद्योग बंदच

चाकण परिसरातील बरेच सूक्ष्म उद्योग बंदच ठेवण्यात आले आहेत. फक्त ठरावीक उद्योगच स्थानिक कामगारांच्या उपस्थित सुरू करण्यात आले आहेत.

वीज आणि परवानगीची समस्या

फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव दिलीप बटवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण परिसरातील उद्योगांना वीज पुरवठ्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. वेळोवेळी खंडित होणारा वीजपुरवठा मोठी समस्या असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उद्योगांना पुन्हा स्टार्टर मारताना वेगवेगळ्या परवानगी आणि जाचक अटी यांचा सामना उद्योजकांना करावा लागत आहे. त्यामुळे कंपन्या चालवायच्या, का या समस्यांबरोबर लढायचे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दिलीप बटवाल पुढे म्हणाले, कामगार आणि ठेकेदार यांच्यातील शीतयुद्ध संपले पाहिजे. भविष्य निर्वाह निधीत जमा असलेला पैसा अशा कठीण परिस्थितीत सत्कारणी लावता येऊ शकतो तसेच ‘ईएसआयसी’ च्या माध्यमातून तरुणांना बेकारी भत्ता देण्यात यावा, अशी भूमिका बटवाल यांनी मांडली. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांनी मिळून काम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like