Chakan: मॅनेजरकडून कामगाराला लोखंडी रॉडने मारहाण

Chakan: The manager beats the worker with an iron rod आरोपीने 'तू मी सांगितलेले काम का करत नाही' असे म्हणत सचिन यांना शिवीगाळ केली.

0

एमपीसी न्यूज- सहकारी मॅनेजरचे काम ऐकतो पण माझे काम ऐकत नाही, या कारणावरून दुस-या मॅनेजरने एका कामगाराला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. ही घटना 26 जून रोजी रात्री कुरुळी येथील हायटम्प फरनेमन्स कंपनीत घडली.

सचिन बसवराज हुल्ले (वय 30, रा. शिवाजीनगर, मोशी) असे जखमी कामगाराचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कंपनीतील मॅनेजर ज्ञानेश्वर कंटाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन हे त्यांचे मॅनेजर प्रवीण केळकर यांच्या सांगण्यावरून क्वालिटीचे कच्चे काम करत होते.

त्यावेळी आरोपी मॅनेजर ज्ञानेश्वर याने कंपनीतील कामगार सिद्धेश कदम याच्या मदतीने सचिन यांना फोर क्लीप गाडी चालविण्याचे काम सांगितले.

त्यावर सचिन यांनी ‘मला मॅनेजर प्रवीण केळकर यांनी काम सांगितलेले आहे.’ असे म्हटले. यावरून आरोपीने ‘तू मी सांगितलेले काम का करत नाही’ असे म्हणत सचिन यांना शिवीगाळ केली.

तसेच कंपनीतील लोखंडी रॉडने सचिन यांच्या पाठीवर आणि डोक्यावर मारून जखमी केले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like