Chakan : कंपनीसमोर पार्क केलेल्या ट्रकचे टायर चोरीला

एमपीसी न्यूज – म्हाळुंगे येथील बजाज ऑटो कंपनीच्या गेटसमोर पार्क केलेल्या ट्रकचे चार टायर अज्ञात चोरट्यांनी काढून नेले. ही घटना 10 मे रोजी सकाळी अकरा ते 12 मे सकाळी 10 या कालावधीत घडली असून याप्रकरणी 25 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुजितकुमार बालेश्वर लाल (वय 38, रा. बालाजीनगर, चाकण) यांनी याप्रकरणी म्हाळुंगे पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लाल हे एका ट्रान्सपोर्ट कंपनीत मॅनेजर म्हणून नोकरी करतात. त्यांच्या ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक  (एमएच 20 / ईजी 8028 )  म्हाळुंगे येथील बजाज ऑटो प्रा. ली. या कंपनीच्या गेटसमोर पार्क केला होता.

अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या ट्रकचे चार टायर असा एकूण 40 हजारांचा ऐवज चोरून नेला. म्हाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.