Chakan : दुचाकी चोरट्यास नागरिकांनी पाठलाग करून पकडले

एमपीसी न्यूज – सोसायटीच्या गेट समोर पार्क केलेली दुचाकी एका चोरट्याने चोरून नेली. ही बाब निदर्शनास येताच नागरिकांनी चोरट्याचा पाठलाग करून त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना मंगळवारी (दि.  12) रात्री कल्प रेसिडेन्सी, मेदनकरवाडी, चाकण येथे घडली.

दीपक नाना नरवडे (वय 31, रा. सविंदणे, ता. शिरूर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. या प्रकरणी शिवाजी राघू भुजबळ (वय 53, रा. मेदनकरवाडी मराठी शाळेजवळ, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवाजी यांनी त्यांची दहा हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी (एम एच 14 / डी पी 4419) ही दुचाकी मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास मेदनकरवाडी येथील कल्प रेसिडेन्सीच्या गेट समोर पार्क केली. त्यानंतर  एक चोरटा  त्यांची दुचाकी चालवत नेल्याचे निदर्शनास आले.

त्यावरून फिर्यादी शिवाजी आणि त्यांचे पाहुणे प्रवीण बोबडे यांनी चोरट्यांचा पाठलाग करून त्याला पकडले.  त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी चोरट्यावर गुन्हा दाखल  करुन त्याला अटक केली.  चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.