BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : श्री भैरवनाथ महाराज यांच्या उत्सव यात्रेनिमित्त यंदा भरगच्च कार्यक्रम

एमपीसी न्यूज – चाकण (ता. खेड, पुणे ) येथे शनिवार (दि.१८ मे ) ते रविवार (दि.१९ मे ) या सलग दोन दिवसांच्या कालावधीत श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव आयोजित केला आहे. या उत्सवानिमित्त देवाचा अभिषेक, भव्य कुस्त्यांचा आखाडा, मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशा आणि महाराष्ट्राची गौरवगाथा अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन यंदा करण्यात आले आहे.

चाकण येथे शनिवारी (दि. १८ मे २०१९) पासून हा भैरवनाथ महाराजांचा उत्सव सुरु होत आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी पहाटे देवाचा अभिषेक, देवास हारतुरे, मांडवडहाळे व ग्रामसजावट, सायंकाळी छबिना, मिरवणूक हे कार्यक्रम होणार आहेत. करमणुकीसाठी शनिवारी (दि. १८ मे रोजी) रात्री १० वाजता मंगला बनसोडे सह नितीनकुमार यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे.

  • रविवारी (१९ मे २०१९ रोजी) दुपारी ३ ते ६ निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा होणार आहे. पैलवानांना हजारो रुपयांचा यावेळी इनाम देण्यात येणार आहे. रविवारी (दि. १९ मे २०१९ रोजी) रात्री महाराष्ट्राची गौरव गाथा हा मनोरंजनासाठी कार्यक्रम होणार आहे. उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून याचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

श्री. भैरवनाथ उत्सव कमिटी व समस्त ग्रामस्थ मंडळी, चाकण (ता.खेड) आदींच्या वतीने वरील सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष किसन गोरे, माजी सरपंच नंदकुमार गोरे, उत्सव समितीचे महेश शेवकरी, रमेश कांडगे यांनी दिली.

Advertisement