Chakan : दिवाळीनिमित्त गावी निघालेल्या महिलेचे गंठण हिसकावले

एमपीसी न्यूज – दिवाळीनिमित्त मूळगावी जाण्यासाठी निघालेल्या महिलेचे अज्ञात चोरट्यांनी  50 हजार रुपये किमतीचे गंठण हिसकावले. ही घटना शुक्रवारी (दि. 25) सायंकाळी सहाच्या सुमारास चाकण येथील जय भारत चौकात घडली.
_MPC_DIR_MPU_II
संगीता भरत झरेकर (वय 42, रा. चाकण) यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास दिवाळी निमित्त त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी घरातून निघाल्या. चाकणमधील जय भारत चौकाच्या कमानीजवळ आल्या असता मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरून नेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.