Chakan : कामगाराने कंपनीतून केला सहा लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – कंपनीत काम करणा-या कामगाराने कंपनीतून 5 लाख 99 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले. याप्रकरणी कामगारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 22) सकाळी सातच्या सुमारास वासुली चाकण येथील ब्राडंनबर्ग इंडिया प्रा. लि. या कंपनीत उघडकीस आली.

राजन मोतीराम ठाकूर (वय 55, रा. कोथरूड, पुणे) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, महंमद यासीन (वय 24, रा. कालाकोटे कोटबाबू राजोरी सोलकी, जम्मू काश्मीर) या कामगाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महंमद हा फिर्यादी राजन यांच्या ब्राडंनबर्ग इंडिया प्रा. लि. या कंपनीत काम करत होता. शनिवारी रात्री अकरा ते रविवारी सकाळी सातच्या सुमारास त्याने कंपनीतून 5 लाख 99 हजार रुपये किमतीचे लॅपटॉप, कॉपर वायर, अ‍ॅल्युमिनिअम शीट, अ‍ॅल्युमिनिअम प्लेट व इतर साहित्य चोरून नेले. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.