Chakan: डोळ्यांच्या दवाखान्यात चोरी; लॅपटॉप, मोबईल फोन लंपास

Chakan: theft at the eye hospital; Laptops, mobile phone Was stolen रात्री अज्ञात चोरट्यांनी हॉस्पिटलच्या पश्चिमेकडील दरवाजाच्या खिडकीचे गज तोडून आत प्रवेश केला.

एमपीसी न्यूज– चाकण गावातील माणिक चौकात असलेल्या भगवती नेत्रालय हॉस्पिटलमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. चोरट्यांनी हॉस्पिटलमधून एक लॅपटॉप आणि दोन मोबईल फोन चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि.12) सकाळी उघडकीस आली.

भरत गंगाधर राऊत (वय 48, रा. तळेगाव रोड, चाकण) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि.13) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे चाकण येथील माणिक चौकात भगवती नेत्रालय हॉस्पिटल आहे. गुरुवारी दुपारी पाच वाजता त्यांनी हॉस्पिटल बंद केले.

रात्री अज्ञात चोरट्यांनी हॉस्पिटलच्या पश्चिमेकडील दरवाजाच्या खिडकीचे गज तोडून आत प्रवेश केला. हॉस्पिटलमधील सामानाची उलथापालथ केली.

हॉस्पिटलमधून 15 हजार रुपये किमतीचा एक लॅपटॉप, दोन मोबईल फोन असा एकूण 17 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार शुक्रवारी सकाळी हॉस्पिटल उघडल्यानंतर उघडकीस आला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.