Chakan : घराचा दरवाजा उघडून चोरी, महिलेचा विनयभंग

Chakan : Theft by opening the door of the house, molestation of the woman

एमपीसी न्यूज – खिडकीतून हात घालून दरवाजा उघडून मोबाईल फोन आणि रोकड चोरली. तसेच घरात झोपलेल्या महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. 9) पहाटे तीन वाजता नाणेकरवाडी येथे घडली.

याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला नाणेकरवाडी येथे एका भाड्याच्या खोलीत राहतात. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीने खिडकीतून हात घालून घराचा दरवाजा उघडला. घरातून 15 हजार रुपयांचा मोबाईल फोन आणि पाच हजार रुपयांची रोकड असा एकूण 20 हजारांचा ऐवज चोरला.

त्यानंतर आरोपीने फिर्यादी महिलेशी गौरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. यामुळे फिर्यादी यांना जाग आली. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या पतीने आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने त्यांना धक्काबुक्की आणि मारहाण करून धूम ठोकली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like