Chakan : इलेक्ट्रिक डीपीतील 108 किलो तांब्याच्या तारांची चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – इलेक्ट्रिक डीपीमधील 108 किलो वजनाच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्या. तसेच डीपीमधील 220 लिटर ऑइल सांडून नुकसान केले. ही घटना गुरुवारी (दि. 9) सकाळी साडेआठच्या सुमारास खेड तालुक्यातील काळुस येथील कदमवाडी येथे उघडकीस आली.

लाईनमन सुरेश मारुती गोपाळे (वय 59) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील काळुस येथील कदमवाडी येथे महावितरणचा इलेक्ट्रिक डीपी आहे. अज्ञात चोरट्यांनी त्या डीपीमधील 40 हजार रुपये किमतीच्या 108 किलो वजनाच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्या.

तसेच डीपीमधील 16 हजार रुपये किमतीचे 220 लिटर ऑइल सांडून त्याचे नुकसान केले. हा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. याबाबत लाईनमन गोपाळे यांनी अज्ञातांवर गुन्हा नोंदवला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.