Chakan : बंद घराचे कुलूप तोडून सव्वा लाखाची चोरी ; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी एक लाख 20 हजार रुपये किमतीचे दागिने, रोकड आणि कपडे चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 10) पहाटे साडेचारच्या सुमारास एकतानगर चाकण येथे उघडकीस आली.

राहुल धोंडिबा गोपाळे (वय 33, रा. एकतानगर, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल यांचे घर शनिवारी रात्री साडेअकरा ते रविवारी पहाटे साडेचार या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून 35 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, साड्या आणि कपडे असा एकूण एक लाख 20 हजार रुपये कितमीचा ऐवज चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.