Chakan : बांधकाम साईटवरून पावणेनऊ लाखांच्या प्लंबिंग साहित्याची चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बांधकाम साईटवरील पत्र्याच्या शेडमधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 8 लाख 78 हजार 856 रुपयांचे प्लंबिंगचे साहित्य चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 14) सकाळी साडेआठच्या सुमारास खेड तालुक्यातील शिंदे वासुली येथील रत्नरूप प्रोजेक्ट प्रा. लि.च्या साईटवर उघडकीस आली.

गणेश बाळासाहेब म्हस्के (वय 30, रा. आळंदी) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे वासुली येथील रत्नरूप प्रोजेक्ट प्रा. लि. या कंपनीची बांधकाम साईट सुरु आहे. या साईटच्या कामासाठी प्लंबिंगचे साहित्य एका पत्र्याच्या शेडमध्ये ठेवले होते. बुधवारी रात्री साडेनऊ ते गुरुवारी सकाळी साडेआठ या कालावधीत हे शेड कुलूप लावून बंद होते.

अज्ञात चोरट्यांनी शेडचे कुलूप तोडून त्यातून 8 लाख 78 हजार 856 रुपये किमतीचे प्लंबिंगचे साहित्य चोरून नेले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.