Chakan : निघोजे येथील घरफोडीत 64 हजारांचा माल लंपास

Theft worth Rs 64,000 in burglary at Nighoje

एमपीसी न्यूज – चोरटयांनी दोन घरातून 64 हजारांचा माल लंपास केला. हि घटना निघोजे (ता. खेड ) येथे बुधवारी (दि. 17) सायंकाळी उघडकीस आली.

याप्रकरणी योगेश अशोक काटकर (वय. 31, रा. निघोजे, तालुका खेड) यांनी चाकण पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश काटकर बुधवारी (दि. 17) सायंकाळी घरी नसताना चोरटे दरवाजाची कडी तोडून त्यांच्या घरात घुसले. त्यानंतर घरातील जवळपास 20 हजार माल चोरून नेला. सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला.

दरम्यान, काटकर यांच्या घराशेजारी राहणारे अंकुश हणमंत रेडेकर ( वय, 34) यांच्या घरात सुद्धा या चोरटयांनी हात साफ करत सुमारे 44 हजारांचा माल लंपास केल्याचे निदर्शनास आले आहे. असे मिळून चोरटयांनी  जवळपास 64 हजारांचा माल चोरून नेला.

या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.