Chakan : चोरट्यांनी चाकण, आळंदीमधून तीन दुचाकी पळविल्या

एमपीसी न्यूज – चाकण आणि आळंदी परिसरातून 75 हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. चाकणमधील एकाच इमारतीमधून दोन दुचाकी चोरून नेल्या आहेत. याबाबत चाकण आणि आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दादापाटील दत्ताराम आव्हाड (वय 24, रा. बाळकृष्णनगर, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (दि. 3) रात्री साडेदहा ते बुधवारी (दि. 4) सकाळी आठ या कालावधीत आव्हाड यांनी त्यांची एमएच 15 / ईके 0279 ही 20 हजार रुपये किमतीची दुचाकी त्यांच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली.

_MPC_DIR_MPU_II

याच कालावधीत याच इमारतीमधून एमएच 26 / एएन 2059 ही दुचाकी देखील अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याप्रकरणी बळीराम जगन्नाथ बोकारे (वय 29) यांनी चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांची 30 हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

भागवत गंगाधर पराड (वय 29, रा. जुने एसटी स्टॅन्डजवळ आळंदी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भागवत यांनी त्यांची 25 हजार रुपये किमतीची एम एच 14 /जी पी 2978 ही दुचाकी सोमवारी (दि. 2) आळंदी येथील जुन्या पुलावर पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.