Chakan : सात महिन्यांचे वासरू कापताना तिघांना अटक

Three arrested for slaughtering seven-month-old calf

एमपीसी न्यूज – सात महिन्यांचे वासरू (बैल) कापताना चाकण पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र पशु संवर्धन कायदा 1976चे कलम 5 सहकलम महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 2005 कलम 9 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी (दि. 25) रात्री सव्वा एकच्या सुमारास चाकण गावातील खंडोबामाळ काकर गल्लीत ही करवाई करण्यात आली आहे.

समीर सब्बीर शेख (वय 32), अफ्रिद अफजल शेख (वय 22), अफजल नियाउद्दीन शेख (वय 43, सर्व रा. खंडोबामाळ, चाकण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी मनोज नंदकिशोर देशमुख (वय 29, रा. देशमुख आळी, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अफ्रिद शेख याच्या घराच्या बाजूला असलेल्या शेडमध्ये सर्व आरोपी सात महिने वयाचे वासरू (बैल) कापताना आढळून आले.

याबाबत त्यांच्याकडे पशुसंवर्धन विभागाचा कोणताही परवाना नाही. तसेच गोवंश कापणे आणि विक्री करणे यासाठी बंदी आहे.

त्यामुळे पोलिसांनी तिघांना अटक केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.