Chakan : पत्नीसह सासरच्या छळाला कंटाळून पतीची जाळून घेत आत्महत्या

एमपीसी न्यूज – पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांच्या (Chakan) त्रासाला कंटाळून पतीने सासरी जाऊन जाळून घेत आत्महत्या केली. ही घटना खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथे सोमवारी (दि. 3) सायंकाळी साडेसात वाजता घडली.

नितीन सुंदर जाधव असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी नितीन यांच्या वडिलांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नितीन याची पत्नी, साडू प्रताप नारायण चव्हाण (वय 28), मेहुणा रवींद्र नंदलाल सितकल (वय 29), महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन आणि त्यांच्या पत्नीचा प्रेमविवाह झाला होता. सोमवारी सकाळी नितीन, त्याची पत्नी आणि दोन मुले फिर्यादी यांच्या दुकानी आले. तिथून नितीन त्याच्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेला. दुपारी नितीनचा फिर्यादी यांना फोन आला.

Pune Gold Rate : एका दिवसात सोन्याच्या भावात दीड हजार रुपयांची वाढ; तर दोन हजारांनी चांदी देखील महागली

त्याने फोनवर त्याच्या पत्नी आणि सासरच्या लोकांनी त्याला त्रास दिला असून त्याच्या विरोधात पत्नीने पोलिसात तक्रार दिली आहे. त्यामुळे तो तणावात असल्याचे त्याने फोनवर सांगितले. त्यानंतर त्याने (Chakan) आरोपींच्या घरासमोर जाऊन पेट्रोल ओतून घेत स्वतःला पेटवून आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.